हिन्दी में पढिएँ | Read in English

मदतीचे आवाहन

अभियानाच्या विविध कामांसाठी, विशेषतः जीवनशाळांच्या सुरळीत कामकाजासाठी, आर्थिक आणि अन्य प्रकारच्या मदतीची गरज भासत असते. स्थानिकांच्या सहकार्याने अभियानाची अनेक कामं पार पडतच असतात; पण स्थानिक समूहांची जमीन आणि जंगल संसाधनं पाण्याखाली गेल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या मदतीचा ओघ मंदावला आहे. जीवनशाळांना याचा मोठाच फटका बसला आहे. आज काही प्रमाणातील स्थानिक मदत आणि भारतातील संवेदनशील नागरिकांकडूनं व संस्था-संघटनांकडून होणाऱ्या मदतीच्या आधारावर जीवनशाळा उभ्या आहेत. विनाशकारी विकासामुळे बिघडून गेलेलं नर्मदेच्या खोऱ्यातील चित्र पुन्हा सुंदर करण्यासाठी, दुर्गम भागातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळा आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी नर्मदा नवनिर्माण अभियान कार्यरत आहे. या कामात अभियानाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही खालील प्रकारे मदत करू शकाल –

  • अभियानाच्या कार्याला सढळ हस्ते मदत करून.
  • जीवनशाळेतील एका विद्यार्थ्याचा खर्च उचलून दरमहा २५०० रू. याप्रमाणे १० महिन्यांसाठी २५००० रू. (खर्चाचा तपशील आम्ही स्वतंत्रपणे देऊ शकू.)
  • जीवनशाळांमधील साधने, फर्निचर, शैक्षणिक साहित्य अशी किंवा यासाठी वस्तुरूप मदत करून.
  • कृपया नोंद घ्यावी –
  • आम्ही परदेशी मदत स्वीकारत नाही.
  • जीवनशाळांना शासकीय मदत मिळत नाही कारण या शाळांना ‘स्वयं अर्थसहाय्यित’ मराठी शाळा म्हणून परवानगी मिळाली आहे.
  • रेशन दुकानांमधून आम्ही कमी किमतीत धान्य खरेदी करत होतो. पण केंद्र सरकारने ही सुविधा २०१८-१९ पासून काढून घेतली आहे. त्यामुळे आता आम्हाला खुल्या बाजारातून खरेदी करावी लागते.
  • नर्मदा नवनिर्माण अभियानाला केलेली आर्थिक मदत कलम ८० जी अंतर्गत इन्कम टॅक्समधून सवलत मिळण्यास पात्र आहे.

चेक / डीडी ‘नर्मदा नवनिर्माण अभियान (Narmada Nav Nirman Abhiyan) या नावाने काढावा. त्याबरोबर तुमचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि पॅन क्रमांक हा तपशील पाठवावा. चेक / डीडी खालील पत्त्यावर पाठवावे. ज्यांना थेट बँक ट्रान्सफर करायची आहे त्यांनी कृपया परवीन जहांगीर किंवा विजया चौहान यांच्याशी फोनवर संपर्क करावा.

परवीन जहांगीर
२६१, ज्यूपिटर अपार्टमेंट्स
४१, कफ परेड, मुंबई – ४००००५
फोन: ०२२-२२९८४७७९/०९८२०६३६३३५
इमेल – pjehangir@admin

विजया चौहान
फोन: ०९८२०२३६२६७
इमेल : vijaya.chauhan@admin

सुनीती सु.र.
फोन : ९४२३५७१७८४
ईमेल: napm.suniti@gmail.com

Scroll to top